पराभवानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदाच अमेठी दौऱ्यावर !

0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सपाटून मार खावा लागला. एवढेच काय तर खुद्द कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील अमेठीतून पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान लोकसभेचा त्यांचा पारंपारिक मतदार संघ अमेठीतील पराभवानंतर आज बुधवारी राहुल गांधी पहिल्यांदाच अमेठीत जाणार आहेत. राहुल गांधी एक दिवसांच्या दौऱ्यावर अमेठीत जात आहेत. त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा याही दौऱ्यावर असू शकतात. राहुल अमेठीतील गौरीगंज (जिल्हा मुख्यालय) येथे कार्यकर्त्यांना भेटतील आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करतील. त्यानंतर, ते सर्वसामान्य लोकांशी चर्चा करतील.

लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी हे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृति ईरानी यांच्याकडून ५५ हजार मतांनी पराभूत झालेत. मात्र, राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.