नवी दिल्ली- पाच राज्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील सत्ता गमवावी लागली आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर कॉंग्रेस याठिकाणी सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान भाजपच्या या पराभवबाबत विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलविली आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होऊ नये यासाठी भाजपने खबरदारी घेतली आहे. या बैठकीला तीन राज्यातील नेते उपस्थित राहणार आहे.
दरम्यान आज मंत्रीमंडळ बैठक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मंत्र्यांशी देखील याविषयावर चर्चा करणार आहे.