जळगाव । परिवर्तन जळगावच्यावतीने बंदूक्या या बहुचर्चित मराठी सिनेमाच्या एका विशेष शोचे प्रदर्शन व दिग्दर्शक राहुल चौधरी या जळगाच्या आपल्या मातीतल्या कलांवताने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून त्याच्यासह प्रमुख कालावंतांचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे. जळगावच्या मातीतले राहुल मनोहर चौधरी यांनी आपला सिनेक्षेत्रात ठसा कायमस्वरूपी उमटवला तो बंदूक्या सारखी उत्तम कलाकृती या महाराष्ट्राला देऊन. आत्ताच 1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर बंदूक्या प्रदर्शित झाला आणि सर्वत्र गाजत आहे. राहुलने नाट्यशास्त्रात पदवीत्तर शिक्षण घेतले असून पथनाट्य व थेटर करत करत त्याने आत्तापर्यंत मुंबई, पुणे व नाशिक येथे शब्द क्रिएशन या त्यांच्या ऍक्टिंग स्कूल अंतर्गत जवळजवळ 1700 मुलांना अभिनयाचे धडे दिले आहेत. अशा या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वचा सत्कार व कार्याचा गौरव व्हावा म्हणून परिवर्तनने पुढाकार घेतला आहे.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
परिवर्तनच्यावतीने आज सोमवार 4 सप्टेंबर रोजी सायं 4:30 वा जैन हिल्स येथील गांधी तीर्थच्या सभागृहात सन्मान व सिनेमाचे प्रदर्शन होणार आहे. राहुल चौधरी यांच्या सह सिनेमातील प्रमुख कालावंतांच्या सन्मान प्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन , पद्मश्री ना. धों. महानोर, यांच्यासह आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थितीचे आवाहन शंभु पाटील, पुरुषोत्तम चौधरी , नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत , यांनी केलय. वसंत गायकवाड़, मंजुषा भिडे, हर्षल पाटील, मंगेश कुलकर्णी, राहुल निबांळकर, उदय येशे, स्वनिल महाजन , मोना तडवी आदी यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.