परिवर्तनासाठी महापुरूषांचे विचार जोपासा

0

शहादा। हा देश कायद्याने चालणारा आहे. समाज व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणायचे असेल तर बहुजनांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेतूनच जगले पाहिजे अन्यथा येणार्‍या पिढीला नव्या गुलामगिरीला सामोरे जावे लागणार असून त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होवू शकतो. दलित व बहुजनांनी जागृत होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सांगली येथील श्रमिक मुक्ती दलाचे धनाजी गुरव यांनी केले.

काव्यसंमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
शहादा येथील केशरानंद पार्क येथे भीम पर्व संवाद यात्रा फुले आंबेडकर स्टडी सर्कलतर्फे समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून धनाजी गुरव हे बोलत होेते. अध्यक्षस्थानी चुनिलाल ब्राम्हणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद कुवर, आत्माराम बागले, माणिक सुर्यवंशी, कॉ. ईश्‍वर पाटील, विक्रम कान्हेरे, शशिकांत कुवर, स्वरूप बोरसे, दादा जगदेव, सुनिल शिरसाठ, मोहन शेवाळे, बापू घोडराज, मुनेश जगदेव, सुरेंद्र कुवर, रमाशंकर माळी, अनिल कुवर, राजेंंद्र वाघ, विनोद ढोडरे उपस्थित होते. भीम पर्वाच्या दुसर्‍या सत्रात कवी संमेलन घेण्यात आले. या कवि संमेलनात ज्येष्ठ साहित्यीक कवी वाहरू सोनवणे अध्यक्षस्थानी होते. या कवि संमेलनात राजू हाके, प्रा. दत्ता वाघ, भास्कर अमृतसागर धुळे, मिलिंद ढोडरे नंदुरबार, भीमसिंग पवार अंबापूर, प्रदिप केदारे आदी कविंनी आपल्या मायबोली भाषेत कविता सादर केल्या.समारोहासाठी चुनिलाल ब्राम्हणे, किरण मोहिते, नरेंद्र महिरे, सुनिल पाटोळे, शांतीलाल अहिरे, रतिलाल सामुद्रे, सिद्धार्थ बैसाणे, भरत भामरे, अनिल कुवर, वनिता पटले, तात्याजी पवार, प्रदिप केदारे, दिलीप पानपाटील, संजय निकुंबे आदींनी कार्यक्रम घडवून आणला.