परिवर्तन व प्रगतीमध्ये द्विपक्षीय उमेदवार सत्ताधारीच

0

चाळीसगाव । चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन व प्रगती पॅनलमध्ये अर्धे ईकडचे व अर्धे तिकडचे म्हणजे काही उमेदवार हे सत्ताधारीच आहेत त्यांनी फक्त आर्थिक देवाणघेवाण साठी एकमेकांना विरोध केल्याचे उत्कर्ष पॅनल प्रमुख यांनी पत्रपरिषदेत सांगितले. 10 रोजी होणार्‍या निवडणूकीत वरील दोन्ही पॅनलच्या लोकांनी 15 ते 20 वर्षात काय केले डॉ सत्यजित पुर्णपात्रे गेल्या 7 वर्षात रिक्त जागेवर संचालक असतांना कामाचा काय ठसा उमटवला व किती मिटींगला हजर होते असा सवाल उपस्थित केला.

भुलथापांना बळी न पडण्याचे मतदारांना आवाहन
प्रगती पॅनल प्रमुख भाऊंच्या विरोधात भ्रष्टाचार व गैरकारभाराचे आरोप केले असतांना डॉ बापुंनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच पॅनलला उभे राहणे हे कोडेच असल्याचे सांगीतले तर विद्यमान सचिव यांना 1992 च्या घटनेतील दुरुस्ती 20 वर्ष उलटुनही मंजुर करुन आणता आली नाही व मागील 3 पंचवार्षिक मध्ये निवडुन आलेल्या संचालकांची नावे चेंज रिपोर्ट सादर करुन परिशिष्ट -1 मध्ये समाविष्ट करता येत नसतील तर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात का उतरावे असा सवाल उपस्थित करत महाविद्यालयाच्या नॅक मानांकनात गुणांची घसरण झाली संस्थेच्या 3 एकर जागेवरील अतिक्रमण यांना दिसले नाही आदी आरोप करत त्यांच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन मतदारांना केले व उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहन केल यावेळीे विजय शर्मा, कैलास पाटील, रघुनाथ पाटे, अरविंद परचुरे, अरुण पाटील, सतीश पाटे, प्रकाश पिंगळे, योगेश भोकरे, मनोहर सूर्यवंशी उपस्थित होते.