जळगाव । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पारदर्शी यत्रणेमुळे प्रतीकुल परिस्थितीत असणारे विद्याथर्भ देखील परीक्षा उत्तीर्ण होत आहे. महिला देखील स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून आघाडीवर येत आहे. कठोर परिश्रम व अडचणीवर मात करुन स्पर्धा परीक्षेला सामारे जाणार्या विद्यार्थ्यांना नक्कीच यशाचेद्वार खुले आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करणाची आवश्यकता असून कठोर परिश्रमाला पर्याय नसल्याचे प्रतिपादन राज्यसेवा परिक्षेत प्रथम आलेले भुषण अहिरे यांनी केले. शनिवारी 8 रोजी युनिक अॅकॅडमीतर्फे राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या यशवंताचा गौरव करण्यात आला. कांताई सभागृहात सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
82 विद्यार्थी उत्तीर्ण
अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासह पुणे युनिक अॅकॅडमीचे पदाधिकारी उपस्थित होते. युनिक अॅकॅडमीचे 82 विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. राज्यातुन प्रथम आलेला भुषण अहिरे, सुदर्शन पाटील, निलम बाफना यांचा गौरव करण्यात आला. स्वागताला उत्तर देतांना सत्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुनिल गरुड यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र देशमुख यांनी तर आभार सुनिल देशमुख यांनी केले.