साक्री । व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.डी.बोरसे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पदार्थ विज्ञान प्रशाळेचे प्रमुख व उद्घाटन डॉ.एस.टी.बेंद्रे, अधिसभा सदस्य, एम.फक्टो संघटनेचे कोषाध्यक्ष व एन.मुक्टो प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय सोनवणे, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ.आर.आर.अहिरे, व्हीएनआयटी नागपूरचे डॉ.बी.आर. शंखपाल, इंदोर येथील डॉ.डी.एम.फासे, नवोदय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संचालक वसंतराव पाटील, कोल्हापूर विद्यापीठातील डॉ.निशांत देशपांडे, अधिसभा सदस्य डॉ.पी.बी.अहिरराव, डॉ.सुनिल गोसावी, पदार्थ विज्ञान अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.के.जी.कोल्हे, डॉ.आर.एस. खडायते, डॉ.इ.जी.नेहते, डॉ.सतिश चौधरी, डॉ.आर.बी.वाघुळदे, प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने आदि उपस्थित होते.
विविध विद्यापीठांचा एकत्रित उपक्रम
परिषदेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, युजीसीडीएइ केंद्र इंदोर, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ व गुजरात राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले दीडशेहून अधिक संशोधक, अभ्यासक व तज्ञ सहभागी झालेत. एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत 83 युवा संशोधकांनी विविध विषयांवर आपले संशोधन पेपर्स सादर केलेत. आयएसबीएन नामांकन प्राप्त या संशोधन जर्नलमधे 35 पेपर्स प्रकाशित करण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते संशोधन जर्नलचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक परिषदेचे संयोजक डॉ. सचिन नांद्रे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.आय.यु. शेख व आभार प्रदर्शन प्रा.आर.बी. अहिरराव यांनी केले. परिषदेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.