भुसावळ । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपल्या वार्षिक अहवालात सांगिल्याप्रमाणे मागील वर्षी 2 कोटी 83 लाख वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी केले गेलेले वृक्षारोपण केवळ फोटोसेशन पुरता होते अशी भीती पर्यावरणप्रेमींमधे असून या वृक्षांपैकी शासनातर्फे भुसावळ परिसरात केल्या गेलेल्या वृक्षारोपणापैकी किती रोपे जगली. कोणत्या प्रकारे त्यांचे संवर्धन झाले, याचा अहवाल मागवावा अशी मागणी पर्यावरणप्रेमींतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
वृक्षारोपण ठरतेय फोटोसेशन
वृक्षारोपणाचा निर्णय आपल्या सर्वांच्या भविष्याचा व भावी पिढीला उपयुक्त ठरणार आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाची स्थिति अतिशय बिकट झालेली आहे. वनसंपदा तसेच आरोग्यसंपदाचा विचार करणे गरजेचे आहेच. त्यादृष्टीने सरकार वृक्षरोपणाचे कार्यक्रम राबविते, मात्र हे उपक्रम केवळ फोटोशेसन पुरते होत असून प्रशासनातर्फे यावर होणारा खर्च, प्रत्यक्ष लागवड याचा दर महिन्याला आढावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
योग्य नियोजनाची आवश्यकता
शासनाच्या योजना अतिशय चांगल्या असतात परंतु राबवणार्या यंत्रनेवर सर्व काही अवलंबून असते. कोट्यावधी रुपयांचा निधि या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वापरला जातो त्याचे योग्य नियोजन झालेच पाहिजे तसेच यावर्षी केल्या जाणार्या वृक्षारोपणाचा दर महिन्याला अहवाल मागवावा व संवार्धनाचे महान कार्य पूर्ण करावे अशी मागणी ग्रीन अर्थ फाउंडेशनचे सचिव संजीव पाटील तसेच भुसावळ शिवसेना पदाधिकारी प्रा.धिरज गणेश पाटील, युवा सेना चिटनिस सूरज पाटील, अमोल पाटील, सुरेंद्र सोनवणे, हर्षल पाटील यांनी केली आहे.