परिसर स्वच्छतेसाठी तरूणाई सरसावली

0

थेरगाव सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

चिंचवड : आपला परिसर घाण झाला आहे, प्रशासन काही करत नाही, कारवाई झाली पाहिजे, फक्त या चर्चा करुन वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा आणि कुणाची तरी वाट पाहत बसण्यापेक्षा आपला परिसर आपणच स्वच्छ करू असा संकल्प घेत तरुणाई सरसावली आहे. स्वच्छतेसाठी थेरगाव सोशल फाउंडेशनने ‘दोन तास थेरगावसाठी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या युवकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

राबविले सफाई अभियान
यावेळी तरूणांनी डांगे चौकातील उड्डाणपूलाच्या खांबावर, भिंतीवर लावलेले बेकायदेशीर असंख्य पोस्टर्स, स्टिकर्स, बॅनर्स काढण्यात आले. यामधे क्लासेस, दवाखाने, विविध उपचार केंद्र, रियल इस्टेट, प्लेसमेंट सर्विसेस, ऑफ़िसेस, हॉटेल्स अशा अनेक व्यावसायिकांनी लावलेल्या जाहिराती होत्या. या सगळ्यांमुळे चौकाचे विद्रूपीकरण झाले होते. याकडे पालिका प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असते. यामुळे थेरगाव सोशल फाउंडेशनच्या युवकांनी पुढाकार घेत साफसफाई अभियान राबवले. आयोजकांकडून वाहतूक पोलीस, वॉर्डन, तसेच नागरिकांना विद्रूपीकरणाच्या विरोधात जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानात अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, अनिल घोडेकर, निलेश पिंगळे, सुशांत पांडे, मयूर कांबळे, निखिल माळी, अमोल शिंदे, राहुल जाधव, राकेश गवळी, तुषार कांबळे, रोहित ढोबळे, प्रकाश गायकवाड, दत्ता एरंडे, दशरथ रणपिसे, श्रीकांत धावारे, अंकुश कुदळे, सचिन क्षीरसागर सहभागी यांनी पुढाकार घेतला.