परिस्थिती गंभीर होत आहे आरोग्य विभागाने यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा – खा उन्मेश पाटील

खासदार उन्मेश पाटील यांनी घेतला चाळीसगावातील कोरोनास्थितीचा आढावा.

चाळीसगाव – कोरोना लसीकरणासाठी फिरफिर सुरू आहे. नागरीक ट्रॉमा केअर सेंटर येथे जावून पुन्हा अंधशाळा येथे जातात. यासाठी गावात फलक लावून जनतेला दिलासा द्या. होम कॉरंटाईन रुग्णांची तपासणी काळजीपूर्वक होत नसून तशी सुचना परीसरात होत नसल्याने संबधित कोरोना रुग्ण इतरांना “प्रसाद” वाटतो ही वस्तूस्थिती आहे. आज जे तीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत ते कोरोना स्प्रेडर होत असुन ही बाब प्रशासनाने गंभीर घ्या. आरोग्य विभागातील ढिसाळपणा बंद करा असे आदेश खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केले. आज खासदार उन्मेश पाटील यांनी कोरोना बाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर , तहसीलदार अमोल मोरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, शैलजा मेमोरिअल हॉस्पिटल संचालक डॉ. मंगेश वाडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, ग्रामीण रूग्णालय वैद्यकिय अधिकारी डॉ.मंदार करंबळेकर, पालिका ओ. एस. श्रीमती फडतरे, सहाय्यक गट विकास अधिकारी आर.आय. पाटील, डी डी शिर्के,नगरसेवक नितिन पाटील, विश्वास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार उन्मेश पाटील यांच्या बैठकीचे फलित
 खासदार उन्मेश पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आज विविध अडचणी मार्गी लागल्या. त्यात प्रामुख्याने मागेल त्याला लसीकरण तसेच हवे त्यांची टेस्ट करावयाचे आदेश देण्यात आले असून अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून आठ तास लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी सूरू ठेवा.असे आदेश देण्यात आले.
सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. ग्रामीण भागात मोठया लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी मोहीम राबवावी. यासाठी आठ ते दहा अतिरीक्त पथके तयार करून विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी
 
मोहीम राबवावी अशी व्यवस्था केली जाणार आहे.
 खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना अतिरिक्त 5 बायप्याप मशीन उपलब्ध करून द्यावेत असे बैठकीतून फोन करून मागणी केली. ती तातडीनं मान्य करण्यात आल्याने आधीच्या सात बायप्याप आणि नव्याने पाच बायप्याप मिळाल्याने जळगाव जिल्हा नंतर सर्वाधिक बारा बायप्यप यंत्रणा उपलब्ध झाल्याने महात्मा फुले जन आरोग्य संकुल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अधिक सदृढ झाले आहे.
ग्रामीण रूग्णालयात पन्नास पैकी वीस बेड कार्यान्वीत झाले नव्हते. तातडीने जिल्हाधिकारी महोदयांना विस बेडला फ्लोमिटर उपलब्ध करुन द्यावेत. अन्यथा स्थानिक पातळीवर खरेदीचे अधीकार द्या. अशी सूचना मांडली. त्यामूळे आधीचे तिस बेड आणि नव्याने वीस बेड उपलब्ध होणार आहे. यामुळे पन्नास बेड मुळे अधिकाधीक रूग्णांना मोफत रूग्ण सेवा मिळणार आहे.
 
ड्युरा ऑक्सीजन प्रकल्प येथे मंजुर
ड्युरा ऑक्सीजन प्रकल्प येथे कार्यान्वीत करावा अशी मागणी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी महोदयांकडे सातत्याने केली होती ती मंजूर झाल्याने आता ग्रामीण रूग्णालयात ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही.
ग्रामीण रुग्णालयात रेमडीसिव्हर उपलब्ध करुन द्यावेत यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करण्यात आल्याने येथील दाखल रुग्णांना कुठल्याही परिस्थितीत रेमडीसिव्हर इंजेक्शन अपूर्ण पडणार नाही. अशी व्यवस्था केली जाणार असल्याने येथील रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ थांबणार आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत विविध अडचणी दूर झाल्याने आढावा बैठकीचे फलित म्हणून अधिकाधीक प्रभावी रूग्ण सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना तालुका वासियांकडून व्यक्त केली जात आहे.