परीक्षा गोंधळानंतरही विद्यार्थ्यांच्या पसंतीचे मुंबई विद्यापीठच

0

मुंबई । मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध पारंपरिक, व्यावसायिक, कौशल्यावर आधारित आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमासाठी सन 2017-18 साठी 2 लाख 60 हजार 746 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मागील शैक्षणिक वर्ष 2016-17 ला 2 लाख 37 हजार 230 विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. या वर्षी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सर्वाधिक मोठी वाढ झाली आहे. या वर्षीच्या प्रवेशामध्ये वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमांकरता 1 लाख 44 हजार 141 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून विज्ञान शाखेसाठी 45 हजार 381 एवढे प्रवेश झाले आहेत, तर कला शाखेतील 23 हजार 337 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.

विद्यापीठाकडून अपेक्षा!
मुंबई विद्यापीठामार्फत पदवीपूर्व प्रवेशासाठी विविध शाखानिहाय एकूण 368 अभ्यासक्रम राबवले जातात. यामध्ये कला शाखेसाठी 165 अभ्यासक्रम, वाणिज्य 32, विज्ञान 39, विधी 06, तंत्रज्ञान 11, फाईन आर्ट 26, डव्हान्स कोर्सेस 67, बीव्होक 1 आणि गरवारे संस्थेमार्फत 21 असे विविध 268 अभ्यासक्रम राबवले जात आहेत. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्‍या मुंबई विद्यापीठाने समाजाचे बौद्धिक आणि नैतिक शक्तिस्थान म्हणून गेल्या 161 वर्षांत भरीव कामगिरी करत सामाजिक मूल्य आणि संधीची जतन करणारी जबाबदारी जोपासली पाहिजे..

पदवीपूर्वी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रतिसाद
विधी शाखेसाठी 5 हजार 124 विद्यार्थी, फाईन आर्टसाठी 504 एवढे विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. मागील आठ वर्षांच्या प्रवेशांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या शैक्षणिक वर्षात पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. सन 2016-17 साठी 2 लाख 34 हजार 230, सन 2015-16 साठी 2 लाख 37 हजार, सन 2014-15 साठी 2 लाख 33 हजार, सन 2013-14 साठी 2 लाख 3 हजार, तर 2012-13 साठी 1 लाख 97 हजार तर 2011-12 साठी 2 लाख 2 हजार, सन 2010-11 साठी 2 लाख 3 हजार आणि सन 2009-10 साठी 2 लाख 476 एवढ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला होता.