‘परे’वरही मिळणार स्वस्तात पाणी!

0

मुंबई । प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांवर हायटेक वॉटर व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात आले. त्याला प्रवाशांचा चागंला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे आणखी मशीन बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कंपनी लि. (आयआरसीटीसी)कडून ही सेवा सुरू करण्यात आली. पश्मिच रेल्वेच्या विविध स्थानकांवर 37 वाटर व्हेंडिंग मशीन्स बसवण्यात येणार आहेत. ‘परे’च्या उपनगरीय मार्गावर बोरिवली, दहिसर, माहिम, प्रभादेवी, महालक्ष्मी, नायगाव, डहाणू रोड, मांटुगा रोड, सफाळे, केळवे रोड या स्थानकांवर प्रत्येकी एक, तर चर्नी रोड, खार, लोअर परळ, पालघर, मरीन लाइन्स या स्थानकांवर प्रत्येकी दोन मशीन्स लावण्यात आलेल्या आहेत.

स्थानकांवर बसवणार मशीन?
येत्या काही दिवसांत माहिम, नायगाव, सफाळे, वानगाव, केळवे, वैतरणा, अंधेरी, दादर, विरार, नालासोपारा, भाईंदर, वसई रोड, मालाड, कांदिवली, गोरेगाव, चर्चगेट, वांद्रे, मीरा रोड, सांताक्रूझ, जोगेश्वरी, विलेपार्ले, ग्रँट रोड आणि बोईसर या स्थानकांवर 37 नव्या मशीन्स बसवण्यात येतील.

असे असणार पाण्याचे दर
प्रवाशांना त्यांच्या बाटलीत एक रुपयात 300 मिली, 3 रुपयांमध्ये 500 मिली आणि 5 रुपयांत एक लिटर, 8 रुपयांमध्ये 2 लिटर आणि 20 रुपयांमध्ये पाच लीटर पाणी मिळणार आहे. एका ग्लासासाठी प्रवाशांना फक्त 2 रुपयांमध्ये पाणी मिळणार आहे.