परोपकार, भाषा व संस्कार हाच आपला परीचय, ब्रम्हलीन जगन्नाथ महाराजांचा उपदेश

0

महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज ; ब्रम्हलीन जगन्नाथ महाराज यांचा 17 वा पुण्यतिथी महोत्सव

फैजपूर- स्वतःला महत्व न देता साधारण व्यक्ती म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ब्रम्हलीन जगन्नाथ महाराज स्वतःह कमी बोलत होते पण कमी बोलण्यात त्यांच्या वाणीत गोडवा होता. चांगले कपडे चांगली गाडी हा आपला परिचय नसून समाजावर प्रेम परोपकार व संस्कार हाच आपला परीचय आहे. अशी शिकवण देणारे जगन्नाथ महाराज यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज समाधीस्थळी उपस्थित असंख्य भाविक भक्तांना आशिर्वचन देतांना सांगितले. ब्रम्हलीन जगन्नाथ महाराज यांचा 17 वा पुण्यतिथी मोहोत्सव 13 व 14 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आल.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
या कार्यक्रमास महाराष्ट्रासह गुजरात मध्यप्रदेश राजस्थान या ठिकाणावरून असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती होती तसेच व्यासपीठावर प.पू.छगन बाप्पा, प.पू.गोपालचैतन्य महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, शामचैतन्यदासजी महाराज, हभप अंकुश महाराज, हभप नितीन महाराज, ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी यासह अनेक संत उपस्थित होते.

गुरूंचा उपदेश सर्वोत्कृष्ट मानावा -गोपाल चैतन्य महाराज
वृंदावनधाम पाल येथील गोपालचैत्यनजी महाराज यांनी आशिर्वचन दिले की, मनुष्य जीवनाचे राहस्य गुरूंच्या सानिध्यात राहून समजते. परम गुरु शरीर रुपी नसून एक तत्व आहे त्यांच्या कृपेने मनुष्य संसारीक तापतून मुक्त होतो. म्हणून प्रत्येकाने गुरूंचा उपदेश सर्वउत्कृष्ट मानावा, असे सांगितले. सतपंथाचे कार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सातासमुद्रापार तर पोहचवलेच पण फैजपूर नगरीत सर्व धर्माच्या संतांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे महत्व पूर्ण काम केले आहे. त्यामुळे जगाच्या पाठिवर फैजपूर नगरीचे नावलौकीक झाला आहे. राष्ट्रीय किर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज म्हणाले की, पुण्यतिथी अशाच संतांची साजरी केली जाते की, जे ब्रम्हलीन होऊन आपले कार्य समाजासाठी भविष्यात प्रेरणा दायक ठरते म्हणून आपण या ठिकाणी आज असंख्य संख्येने उपस्थित आहात. यासह महामंडलेश्वर पुरुषत्तम दासजी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, प.पु छगणबाप्पा महाराज यांनी आशिर्वचन दिले. दरम्यान सतपंथ संस्थानचा अधिकृत पेन आणि 11 कोटी मंत्र जप लिहिलेल्या वह्यांचे पूजन संतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, संजय गांधी अध्यक्ष विलास चौधरी, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यासह असंख्य भाविक भक्त उपास्थित होते. सूत्रसंचलन शैलेंद्र महाजन व निर्मल चतुर यांनी केले. गुरुवारी सायंकाळी 5 ते 7 दरम्यान पुण्यतिथीनिमित्त महापूजा तसेच शुक्रवारी सकाळी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.