भुसावळ। वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे आणि ही हानी भरुन काढण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन हा एकमेव पर्याय असून त्यादृष्टीने कार्य करण्याचे आवाहन प्रा. पंकज भंगाळे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. शहरातील गजानन महाराज नगरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी परिसरातील रहिवाशांनी घेतली.
वृक्षसंवर्धन गरजेचे
याप्रसंगी प्रा. भंगाळे म्हणाले की, वाढते प्रदुषण हि समस्या आपल्या समोर उभी ठाकली असून यामुळे सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे. जागतिरीकणामुळे वृक्षतोडही वाढत आहे. यामुळे प्रदुषण कमी होण्याऐवजी वाढत आहे. याचा परिणाम मानवी अस्तिवावर होत असून संपुर्ण सृष्टी वाचविण्यासाठी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. यावेळी रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष आशिष पटेल, सचिव देवा वाणी, सोनू मांडे, संदिप सुरवाडे, पुरुषोत्तम पटेल, मनिष पाचपांडे, विजय जावळे, विशाल ठोके, सागर वाघोदे, नगरसेवक अमोल इंगळे आदी उपस्थित होते.