धुळे: वृक्षारोपण वृक्षसंवर्धन काळाची गरज लक्षात घेता भविष्यात वृक्षसंवर्धनाची चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी केले. ते वलवाडीस्थीत निसर्ग मित्र समितिचा 15 वा वर्धापनदिन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आयोजित वृक्षारोपणा प्रसंगी बोलत होते.याप्रसंगी अध्यक्षस्थानी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अतुल निकम होते. तर याप्रसंगी जिपचे नुतन मुख्याकार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
राष्ट्रीय कार्यात सर्वांनी सहभागी व्हा
वृक्षरोपण, वृक्षसंवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंवर्धन हे राष्ट्रीय कार्य असुन या राष्ट्रीय कार्यात सवार्ंनी सहभागी व्हावे तसेच 15 वर्षापासुन पर्यावरणाच्या राष्ट्रीय कार्यात निसर्ग मित्र समितीचे योगदान हे उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन गंगाथरन देवराजन यांनी केले. क ार्यक्रमाला प्रा.डॉ.के. बी .पाटील, भोकरचे सरपंच मंगलदास पाटील आदी उपस्थित होते. यशस्वतीतेसाठी समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव पगार, प्रदेश सचिव संतोष पाटिल, धुळे तालुका अध्यक्ष उमाकांत पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष एम.आर. जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख गोकुळ देवरे, समितीचे जिल्हा संघटक राजेंद्र ढोढर, सटाणा तालुकाध्यक्ष राजु राठोड, साक्री तालुका संघटक राकेश जाधव, जिल्हा संघटक प्रा .सुरेश देसले, पी. आर. जोशी, धुळे तालुका कार्यध्यक्ष प्रा. जयवंत भामरे, प्रा.राजेंद्र पाटील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रतिनिधी निसर्ग अहिरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रदेश सचिव संतोष पाटील यांनी केले.