पर्यावरण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने काढली रॅली

0

भुसावळ- पर्यावरण दिनानिमित्त भुसावळ रेल्वे प्रशासनाद्वारे रेल्वे ग्राऊंडकडील बुकींग कार्यालयाजवळून पर्यावरण रॅली काढली. अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा यांनी हिरवी झेंडा दाखवून रॅलीला सुरूवात केली. रॅली रेल्वे दवाखानामार्गे, गांधी पुतळा, ताप्ती क्लब येथून रेल्वे स्काऊट-गाईड मैदानावर आली. तेथे अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरीरष्ठ मंडल अभियंता (पर्यावरण व गृहप्रबंधक) पी.रामचंद्रन, वरिष्ठ मंडल अभियंता (कार्य) एम.एस.तोमर, वाणिज्य प्रबंधक व्ही.पी.दहाड, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (कोचिंग) बी.अरुणकुमार आदींनी वृक्षारोपण करून पर्यावरण बचावचा संदेश दिला.

यांचा रॅलीत सहभाग
रॅलीत रेल्वे स्काऊट गाईडचे विद्यार्थी तसेच वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी मनोज गांगुर्डे, वरीष्ठ मंडल अभियंता (समन्वय) विनोद भंगाळे, वरिष्ठ मंडल अभियंता (पर्यावरण व गृहप्रबंधक) पी.रामचंद्रन, मंडल अभियंता (कार्म) एम.एस.तोमर, वाणिज्य प्रबंधक व्ही.पी.दहाट, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (कोचिंग) बी.अरुणकुमार, अजयकुमार, स्थानक संचालक जी.आर.अय्यर, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे आदींचा सहभाग होता.