भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथील रुपाली विशाल सूर्यवंशी यांची पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नरेंद्र मोदी विचार पर्यावरण विभागाचे राज्या प्रदेशाध्यक्ष संजय धार्गे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी संतोष राठोड, लघूविकास विभागाचे जिल्हाध्यक्ष नारायण कोळी, नरेंद्र मोदी विकास मंचच्या जिल्हाध्यक्षा नीता गाजरे, उपाध्यक्षा राजश्री नेवे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.