पर्यावरण सप्ताहानिमित्त सभापतींच्या हस्ते वृक्षरोपण

0

नवापुर। तालुक्यातील मौजे बोकझर व जामतलाव येथे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताहनिमित्त पं.स सभापती सविता गावीत, तहसिलदार प्रमोद वसावे,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांचा हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर गावात सुरु असलेले घरकुल कामाची पहाणी व शौचालय कामाची पहाणी पं.स सभापती सविता गावीत, तहसिलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केली. यावेळी विस्तार अधिकारी किरण गावीत, दिलीप कुवर, सरपंच राहुल गावीत, सदस्य अमित गावीत, सतीका गावीत, इदा गावीत, सलिता गावीत, शांती गावीत, जामतलाव गावाचे सरपंच सुरेश गावीत, व ग्रामसेवक तलाठी झे.के.गायकवाड, एस.जी देसाई, कृषी विस्तार अधिकारी विश्वास बनसोडे, ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील प्रत्येकाने घरासमोर किमान 2 वृक्ष लावण्याची अपेक्षा
यावेळी तहसिलदार प्रमोद वसावे म्हणाले की गावात वृक्षलागवड जास्त प्रमाणात करणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक नागरीकांनी आपल्या घरासमोर किमान दोन वृक्ष लावावेत. जसे आपण आपल्या कुंटुबाची काळजी घेतो तसेच वृक्षाजी काळजी घ्या. तसेच तुमचे प्रधानमंत्री आवास योजने अंर्तगत घरकुल काम प्रगती पथावर आहे ,शौचालय कामे 2016 मध्ये पुर्ण झाले आहे. मी सरपंच ग्रामस्थ यांचे अभिनंदन करतो असे सांगितले. यानंतर बोकलझर गावाचे सरपंच राहुल गावीत, गटविकास अधिकारी नंदकुमार कुमार वाळेकर, पं.स सभापती सविता गावीत यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन बोकलझर गावाच्या ग्रामसेविका कल्पना वसावे यांनी तर आभार सरपंच राहुल गावीत यांनी मानले.