पर्यावरण समतोल राखण्याकरीता वृक्ष लागवडीसाठी उपोषण

0

तळोदा । शहरात रस्ता रुंदीकरण सुशोभीकरणासाठी वृक्षतोड करण्यात आली त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करण्यात यावी या मागणीसाठी दिग्विजय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय माळी यांनी आज पासून उपोषणाला बसले होते परंतु, त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने त्यांनी आपले उपोषण लिंबू पाणी घेवून सोडले.

काँगेस नगरसेवकांनी घेतली भेट
दरम्यान याबाबत उपोषणस्थळी काँग्रेस चे प्रतोद गौरव वाणी, गटनेते संजय माळी, नगरसेवक सुभाष चोधरी नगर सेवक हितेंद्र क्षत्रीय, योगेश मराठे, आदींनी भेट देऊन दिग्विजय माळी यांचा आंदोलनास पाठींबा दिला. तर उपोषणस्थळी सेनेचे शहर अध्यक्ष जितेंद्र दुबे यानी भेट घेऊन चर्चा केली.

निवेदनाचा आशय
तळोदा शहरात नगरपालिका मार्फत शहादा रस्त्याची रुंदीकरण व सुशोभीकरणाच्या नावाखाली चिनोदा चौफुली सर्कल पासून ते फॉरेस्ट नाका पावेतो मोठ मोठी डेरेदार वृक्ष तोडण्यात आली वृक्ष तोड झालेल्या जागेवर नवीन वृक्ष लावण्यात यावे अश्या अशेयेचे निवेदन दिनांक 25 जानेवारी रोजी देण्यात आले होते. परंतु, त्यावर कोणतीच कार्यवाही नाही याबाबत त्यांनी विचारणा केली असता त्यांना समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली म्हणून वृक्षतोड केलेल्या जागी पुन्हा सोईच्या जागेवर नवीन वृक्ष लावण्यात यावे या मागणीसाठी दिग्विजय माळी उपोषणाला बसले होते.

तळोदा नगरपालिके मार्फत शहर सुशोभीकरनाला किव्हा विकास कामांना माझा विरोध नसून पर्यावरणाचा र्‍हास व मोठ मोठ्या वृक्षांची कत्तल करून विकास अपेक्षित नाही.
दिग्विजय माळी
स.अध्यक्ष, दिग्विजय प्रतिष्ठान