पर्यावरण स्पर्धेत नूतन खरात प्रथम

0

पिंपरी-चिंचवड : वृक्ष प्राधिकरण आयोजित 24 व्या फुले-फळे भाजीपाला बागा वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शाअंतर्गत ’खेळ रंगला पर्यावरणाचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक नूतन खरात यांनी मिळविला. पर्यावरण आधारित अनेक प्रश्‍नोत्तरे, गाणी यामधून 24 स्पर्धकांची निवड करण्यात आली.

प्रश्‍नोत्तरामध्ये किल्ल्यांची जास्तीत जास्त माहिती विचारण्यात आली. आंब्याच्या पानांचे तोरण, झेंडुच्या फुलांचे हार बनविणे, मटार सोलणे, केळी खाणे असे एक मिनिटाचे गेम शो घेण्यात आले. यामध्ये चार विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. इतर विजेत्यांना गुलाबाची रोपे देण्यात आली. विजेते असे : नूतन खरात (प्रथम), अनुष्का जोशी (द्वितीय), राणी तांगडे (तृतीय). उत्तेजनार्थ – लक्ष्मणा रघुवंशी यांना बक्षिसे देण्यात आली. निवेदन सरोज राव यांनी केले. संयोजनासाठी अंजली मकदुम, सारंग राव यांनी केले. उद्यान अधीक्षक पी.एम. गायकवाड यांनी सहकार्य केले.