गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची तब्येत पुन्हा बिघडल्यामुळे भारतीय जनता पार्टीची केंद्रीय समिती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गोव्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या सहा तारखेला अमेरिकेहून गोव्याला परतल्यापासून पर्रीकर कार्यालयात गेले नसून ते घरीच विश्रांती घेत आहेत. ते उपचारासाठी गोव्यातल्या रूग्णालयात जात असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होतील व पर्यायी नेतृत्वाची व्यवस्था करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
पर्रीकरांनी शुक्रवारी रूग्णालयाला भेट दिल्यानंतर राज्यातल्या अन्य नेत्यांना फोन केला तसेच मंत्र्यांना बोलावून घेतले. याआधी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पर्रीकर विधानसभा बरखास्त करतील व पुन्हा निवडणुकांची मागणी करतील असा दावा गव्हर्नर मृदुल सिन्हा यांना भेटून केला होता.