पुणे । अखिल पर्वती दर्शन नवरात्र उत्सव व पुणे महापालिकेच्या वतीने पर्वती दर्शन भागामध्ये डेंग्यू विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. महापालिका शाळा 40 जीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्यच्या माध्यमातून संदेश दिला वस्तीतील सर्व नागरिकांना पत्रके देऊन माहिती देण्यात आली. याठिकाणी अनेक घरांजवळ डासांची उत्पत्ती होत असल्याचे दिसून आले. त्याबाबत प्रबोधन करण्यात आले. रॅलीमध्ये अनेक नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. या रॅलीमध्ये सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, नगरसेविका पिसाळ, सर्व महापालिका कर्मचारी, महापालिका शाळेतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पा खंडाळे, अमोल यादव, रुपेश नेवसे, सयाजी जगताप यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक रघुनाथ गौडा यांनी केले.