पर्समधील चार लाखांचा ऐवज चोरीला

0

पिंपरी-चिंचवड : पुणे स्थानकावरुन दिघी येथे बसमधून येत असताना महिलेच्या पर्समधून चार लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी अकरा ते दुपारी साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी माधवी चव्हाण (वय 36, रा.बदलापूर, ठाणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तंतोतंत तिसरी घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवी सकाळी बदलापूरवरून रेल्वेने पुणे स्थानकावर उतरल्या. तेथून त्या कामानिमित्त पाहुण्यांच्या घरी दिघी येथे पीएमपीएमएलने जात असताना त्यांच्या पर्समधील रोख 300 रुपये व सोन्याच्या दागिन्यांची डबी, असा एकूण 3 लाख 86 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशीच घटना काही दिवसांपूर्वी ताथवडे येथे घडली होती. ज्यामध्ये पीएमपीएमएल बसमधूनच प्रवास करत पर्समधून पावणे दोन लाखांचे दागिने चोरीला गेले होते. त्यामुळे शहरात बसच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.