पर्स परत केल्याने पोलिसांचे कौतुक

0

नवी मुंबई । ऐरोली सेक्टर 1 मधील गणेश विसर्जन तलाव जवळ पडलेली पर्स रबाळे पोलिसांना मिळाली. त्या पोलिसांनी संबंधित तरुणीला बोलावून तिची पर्स तिला सुपूर्द करण्यात आली. पोलीस शिपाई विनोद ठाकूर व स्वप्नील काशिद हे अनंत चतुर्थीच्या दिवशी ऐरोली सेक्टर 1मधील तलावावर बंदोबस्तासाठी तैनात होते. तलावाची पाहणी करत असताना त्यांना रस्त्यावर एक पर्स सापडली. पर्स खोलली असता त्यामध्ये एका युवतीचे आधार कार्ड सापडले व तिचा मोबाइल नंबर सापडला. त्यानंतर संबंधित युवतीला बोलून तिची पर्स, कागदपत्र व पैसे तिच्या हातात देण्यात आले. या प्रामाणिकपणामुळे त्या दोन्हीही पोलिसांचे कौतुक होत आहे.