पळसोद गावात घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

0

जळगाव । तालुक्यातील पडसोद गावातील एका घरात 30 एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून दागिन्यांसह रोकड असा 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिगंबर आनंदा पाटील (वय-65) हे कुटूंबियांसोबत पडसोद येथे राहतात. 30 एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर कपाटातील लॉकरचे लॉक तोडून त्यातील 12 ग्रँम सोन्याच्या साखळ्या, 10 ग्रँम सोन्याची टोंगल, 15 ग्रँम वजनाची सोन्याची अंगठी, 5 ग्रँम वजनाची चैन, 10 ग्रँम वजनाची सोन्याची साकळी, 12 ग्रँम वजनाची सोन्याची चिप असे 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 80 हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केला. यानंतर डिंगबर पाटील यांना घरात चोरी झाल्याचे कळाल्यानंतर त्यांनी तालुका पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी हे करीत आहेत.