पळासखेडेत अवैध जिलेटीनच्या साठ्यासह तिघे जाळ्यात

0

तीन ट्रॅक्टर जप्त ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव : जामनेरजवळील पळासखेडे गुजराचे येथे जिलेटीन विस्फोटकांचा अवैधरीत्या साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत तीन ट्रॅक्टरसह तीन आरोपी व जिलेटीनचा साठा मिळून एकूण 21 लाख 14 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रशिक्षणार्थी डीवायएसपी धनंजय पाटील यांच्यासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, महिला उपनिरीक्षक सुप्रिया देशममुख यांच्यासह कर्मचार्‍यांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अटकेतील आरोपींमध्ये मधुकर उर्फ सुपडू राजाराम तायडे, अनिल भागवत सूर्यवंशी, संदीप भागवत सूर्यवंशी (पळासखेडा गुजराचे, ता.जामनेर) यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल असून तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक नजीर शेख व सहकारी करीत आहेत.