भुसावळ । उत्तर प्रदेशातील मुलगा संतापात घर सोडून पळून आला असता भुसावळ स्थानकावर आरपीएफने ताब्यात घेवून पालकांच्या स्वाधिन केलेे. वरिष्ठ विभागिय सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दूबे, निरीक्षक व्ही.के. लांजीवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.एस.हरणे व सहकारी फलाट क्रमांक 4 वर सेवा बजावत असतांना त्यांना संशयास्पदरित्या एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा आढळला.
पालकांशी साधला संपर्क
मुलाची चौकशी केली असता त्याने आपले नाव निरंजन उर्फ मोनू सतिशकुमार पांडे रा.बराईपार जिगना, जिल्हा मिर्जापूर उत्तर प्रदेश असुन घरुन पळून आल्याचे सांगितले.आरपीएफने अल्पवयीन मुलाच्या पालकाशी संपर्क साधल्याने बुधवार 17 रोजी त्यास घेण्यास त्याचे आजोबा दयाशंकर रामलखन पांडे हे भुसावळ येथे त्यास घेण्यास आले. निरीक्षक लांजीवार, उपनिरीक्षक हरणे व एएसआय जयश्री पाटील यांंनी कागदपत्रे व ओळखीचा पुरावा तपासून अल्पवयीन मुलास आजोबांच्या स्वाधिन करण्यात आले.