पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन

0

पिंपरी । पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेतील स्टॉलसाठी महिला बचतगटांचे अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. महापालिका हद्दीतील महिला बचत गट प्रमुखांनी 24 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नागरवस्ती विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.
पवनाथडी जत्रा 18 ते 21 फेब्रुवारी 2020 या कालावधीत सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर भरविण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. वस्तू विक्रीकरिता पवनाथडी जत्रेत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महिला बचतगटांना स्टॉलसाठीचे अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. 9 ते 24 जानेवारी या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यातील अर्ज क्षेत्रीय कार्यालय, नागरवस्ती विकास योजना विभागात स्वीकारण्यात येणार आहेत. संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकृतीही करण्यात येईल. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. स्टॉलाठी फक्त महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनीच अर्ज करावेत, असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.