पवना नदी स्वच्छतेतून केली शिवजयंती साजरी

0

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या अभियानाचा 121वा दिवस

चिंचवड : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचा आजचा 121 वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे पार पडला. शिवजयंतीचे औचित्य साधून नदी घाटावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाला सुरुवात झाली. अभियानात आज 200 लोक सहभागी झाले. यावेळी नदीघाटावर समर्थ क्रिएटीव्ह एनलाईटर्स ग्रुपचे 25 स्वयंसेवक सागर दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली घाटावर श्रमदानासाठी सहभागी झाले. आर्मी रिटायर्ड सचिन घाडगे तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच बी. यु. भंडारी ऑटो मोबाईल्स व ट्रम्प बाईक्सचे संचालक शैलेश जयकुमार भंडारी हे देखील अभियानासाठी उपस्थित होते.

स्वयंसेवकांसाठी मास्कची भेट जयोग पेट्रोलियम टीमतर्फे 10 हजार रुपयांची देणगी व संजय शंकरराव कलाटे यांच्यातर्फे 2100 रुपयांची देणगी या अभियानातील संचयन कक्षामध्ये जमा झाली. तसेच चिंचवडच्या प्रभुणे डायमंडचे श्रीनिवास प्रभुणे बोट क्लब येथे दररोज फिरायला येतात. त्यावेळी त्यांनी अभियानाची माहिती घेऊन सर्व सहभागी व्यक्तींच्या आरोग्यासाठी 2 बॉक्स मास्क आणून दिले. मागील 121 दिवसात जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई संकल्पना याबाबतची माहिती रोटरीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी नवीन सहभागी सदस्यांना सांगितली.

रविवारी या उपक्रमामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अभियंता प्रविण लडकत, रानजाई प्रकल्पाचे आबा मुसुगडे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सोमनाथ हरपुडे, सुनील कवडे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, गणेश बोरा, जगन्नाथ फडतरे, वसंत ढवळे, सुभाष वाल्हेकर, सचिन काळभोर, संदिप वाल्हेकर, स्वाती प्र. वाल्हेकर, स्वाती सुनील वाल्हेकर, प्रणाली हरपुडे, वैशाली खराडे, स्वाती पाटील, संगीता घोडके, अनंता पानसे व कुटुंबिय रविकांत व धनंजय बालवडकर, ज्ञानेश्‍वर आबा वाल्हेकर, एस. पी. वायर्स टिम, राजयोग पेट्रोलियम टिम, पी.सी.सी.एफ., सावरकर मित्र मंडळ, भावसार व्हिजन, पोलिस नागरीक मित्र मंडळ, हरिश मोरे व गार्डन ग्रुप थेरगाव एस. के .एफ व टेल्को कामगार ग्रूप, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अ‍ॅड. हर्षद नढे, अ‍ॅड. महेश टेमगिरे, माजी नगरसेवक सिद्धेश्‍वर बारणे, संजय कलाटे आणि आय.सी.सी. सायकल क्लबचे पाच सदस्य सायकल वर येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत या अभियानात सहभागी झाले. अनेक महिलाबचत गट, अनेक निसर्गप्रेमी व संस्थांचे कार्यकर्ते श्रमदानासाठी सहभागी झाले.

पुढील रविवारी केजुबाई बंधारा
रविवारी वाल्हेरवाडीत जवळ झालेल्या या अभियानात तीन ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर काढण्यात आली. या अभियानामध्ये आजवर 698 ट्रक जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. दररोज चालणारे हे अभियान निसर्ग प्रेमींसाठी पुढील रविवारी (दि. 08 मार्च) केजुबाई बंधारा, रावेत येथे होणार आहे, असे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी सांगितले.