आमदार संजय बाळा भेगडे यांची मागणी
तळेगाव दाभाडे : पवना धरणग्रस्त कृती समितीच्यावतीने पुनर्वसन लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. पवना धरणग्रस्तांचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून यामुळे अनेक मुलभुत प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी शासनाने लवकरात लवकर पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे. यासाठी धरण परिसरातील उर्वरित जमिनींची फेरमोजणी करावी. धरणग्रस्तांच्या वारसांना नोकर्या द्याव्यात तसेच धरणग्रस्तांच्या उपजिवेकेचे साधन बनलेल्या कृषी पर्यटन व्यवसायाला अधिकृतपणे परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन दिले आहे. पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, उपसभापती शांताराम कदम, सचिव दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस गणेश ठाकर उपाध्यक्ष दशरथ शिर्के, बबनराव कालेकर, जिल्हा पर्यावरण समिती सदस्य सचिन मोहिते, सुधीर घरदाळे, यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते
हे देखील वाचा
धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित
यावेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले की, या धरणग्रस्तांचे प्रश्न अनेकवर्षांपासून प्रलंबित ठेवले गेले आहेत. या लोकांचे नीट पुर्नवसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या लोकांना पुर्नवसन करण्याची मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. धरणग्रस्तांचे पुर्नवसन न केल्यामुळे या लोकांनी कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. मात्र आता शासनाकडून या व्यवसायावर बंदी घातली जात आहे. त्यामुळेच पर्यटन व्यवसायाला अधिकृतपणे परवानगी मिळाली पाहिजे.