भुसावळ – डाऊन पवन एक्स्प्रेसमध्ये मोबाईलची चोरी करणार्या मुंबई येथील संशयीतास लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. संशयीतांकडून पाच मोबाईल जप्त करण्यात आले असून इम्रान शेख अब्दुल करीम शेख (रा. वडाळा, मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पवन एक्स्प्रेसने जळगाव स्थानक सोडल्यावर सर्वसाधारण डब्यात सीटच्या खाली ठेवलेल्या बॅगेतील मोबाईल गर्दीचा फायदा घेत काढण्याच्या प्रयत्नात प्रवाशांचे लक्ष गेल्याने प्रवाशांनी त्यास रंगेहाथ पकडत भुसावळ स्थानकावर लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्याकडून पाच मोबाईल जप्त केले. सुनील शर्मा (रा. सुलतानपूर) यांच्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार दामोदर सोळंके तपास करीत आहेत.