पुणे-काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठी शाळा बंद केल्याच्या कारणावरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते. सरकारचा शाळा बंदचा निर्णय शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत नसल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले, ‘शरद पवार यांच्यासारखे अनुभवी लोक निवडणुका आल्या की खूप बोलतात. पण बहुजन समाजाच्या मतावर डोळा ठेवून जे पगड्या बदलतात त्यांना उत्तर देण्याच कारण नाही.’
पुण्यातील सिंबायोसिस मबाविद्यालयाच्या पदवीप्रदान सोहळ्याला ते आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड यापुढे योग्य साहित्यिक करतील या साहित्य महामंडळाच्या निर्णयाचे तावडे यांनी स्वागत केले” साहित्य महामंडळाच्या या निर्णयामुळे यापुढे साहित्य संमेलनात वाद होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.