मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या वारंवार मातोश्रीवर जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यात शरद पवार अनेकदा मातोश्रीवर गेलेत. मात्र या वयात त्यांना मातोश्रीवर जावे लागत आहे हे योग्य नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. किरकोळ गोष्टींसाठी शरद पवारांना मातोश्रीची पायरी चढावी लागते हे योग्य नाही असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या महामारीत घरातच बसून आहेत, राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, मात्र राजकीय चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे असे आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी तळागाळात जाऊन काम करायचे असते, मात्र आताचे मुख्यमंत्री घरातूनच काम करत आहे असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.