नागपूर : संभाव्य तांत्रिक अडचण टाळण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून तो मंजूर करण्यात आल्याची माहिती सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधान परिषदेत दिली.
हे देखील वाचा
संभाव्य तांत्रिक अडचण टाळण्यासाठी जानकरांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विधान परिषदेच्या 11 जागासांठी निवडणूक जाहीर झाली आहे. महादेव जानकर यापूर्वी भाजपचे सदस्य म्हणून विधान परिषदेत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. यामुळे पक्षांतर विरोधी कायद्याचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन जानकर यांनी तातडीने विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. महादेव जानकर यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने संमत केल्याची घोषणा रामराजे निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत केली.