पशूवैद्यकीय चिकित्सालयातून संगणकासह बॅटर्‍यांची चोरी

0

धुळे । शहरातील पारोळा रोडवरील पशुवैद्यकीय चिकित्सालयातून चोरट्यांनी दोन संगणकासह 54 हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना दि 10 रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहरातील पारोळा रोडवर पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारस अज्ञात चोरट्यांनी चिकित्सालयाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला़. तेथून 24 हजार रूपये किंमतीचे संगणकाचे दोन मॉनिटर, 20 हजार रूपये किंमतीचे दोन सी़पीयू. व 10 हजार रूपये किंमतीच्या दोन बॅटर्‍या असे एकूण 54 हजार रूपये किंमती मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान शुक्रवारी सकाळी सुमारास सुरक्षारक्षकाला कडी तोडलेली दिसून आल्याने त्याने पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे डॉ़ विठ्ठल देशमुख यांना माहिती दिली़