पश्चिम बंगालमधील प्रवाशाचा मोबाईल लांबवला : आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशाच्या हातील मोबाईल लांबवणार्‍या भामट्याच्या 12 तासात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. साबीर शहा बबू शहा (18, मच्छीमार्केटजवळ, जा मोहल्ला, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

12 तासात आरोपी जाळ्यात
ईम शेख सिराजुल इस्लाम (21, बुजूंग, विरभुम, पश्चिम बंगाल) हे 7 रोजी 12102 ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या कोच एस- 6 च्या बर्थ क्रमांक 54 वरून शालिमार ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान प्रवास करीत असताना भुसावळ स्थानक आल्यानंतर अज्ञाताने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्ष बलाला हा गुन्हा साबीर शहरा बबू शहा याने केल्याची माहिती मिळाली व तो चोरीचा मोबाईल विकण्यासाठी कन्हैय्याकुंज हॉटेलवर आल्याची माहिती मिळताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई लोहमार्ग अधीक्षक मोक्षदा पाटील, आरपीएफ कमांडंट क्षितीज गुरव, भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक व्ही.बी.घेरडे व आरपीएफ निरीक्षक मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ एएसआय प्रेम चौधरी, एएसआय प्रल्हाद सिंग, लोहमार्ग पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, हवालदार अजित तडवी, कॉन्स्टेबल बाबू मिर्झा आदींनी केली.