मुंबई: पश्चिम बंगालमधील झालेल्या हिंसाचाराला भाजपच जबाबदार असून भाजप हा सत्तेसाठी काहीही करू शकतो, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर केला आहे. आज पर्यंतचा भाजपचा इतिहास पाहता भाजप हा देशात दंगली घडवत आला आहे. त्यांनी बंगालमधील हिंसाचारावर संताप व्यक्त करत ट्वीटर वरून आरोप केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप हिंसाचार घडवून आणत असून, पराभव समोर दिसत असल्याने हे कृत्य करत आहे असाही आरोप त्यांनी आपल्या ट्वीटरवर केला आहे. असा हिंसाचार करून भाजप काय सिद्ध करू पाहत आहे. पंडीत विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबणा भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केला असल्याचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा आरोप त्यांनी लावला आहे.
मंगळवारी बंगालमध्ये जो हिंसाचार उफाळून आला त्यावर त्यांनी हे ट्वीट केले असून आता राज्यातील भाजपचे नेते त्यावर काय प्रतिकिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.