पश्‍चिम बंगालमधील आंदोलनामुळे दहा रेल्वे गाड्या रद्द

0

भुसावळ- पश्चिम बंगालमधील रेल रोको आंदोलनामुळे भुसावळ विभागातून जाणार्‍या 10 गाड्या 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आल्या. त्यात गाडी 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस, 18030 शालिमार -लो.टि.ट एक्सप्रेस, 12810 हावडा -मुंबई मेल, 12130 हावडा-पुणे आझादहिंद एक्सप्रेस, 12102 हावडा-लो. टि.ट ज्ञानेश्वरी एक्सप्रेस तर हावड्याकडे जाणारी गाडी 12859 मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस, 18029 लो.टी.ट – शालिमार एक्सप्रेस, 12809 मुंबई-हावडा मेल, 12129 पुणे- हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, 12151 लो. टि.ट.- समरास्ता एक्सप्रेस या गाड्या मुंबईवरून 26 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.