पश्‍चिम महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के

0

पुणे : पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.8 इतकी नोंदली गेली आहे. मध्यरात्री 11 वाजून 44 मिनिटे आणि 52 सेकंदांनी हे धक्के जाणवले. कोयना बॅकवॉटरमध्ये भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पुण्यापासून 144 किमीवर तर पाण्याखाली 10 किमी खोल होता. सातारा, सांगली, कोल्हापुरात भूकंपाचा धक्का जाणवला. पाटण तालुक्यालाही भुकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर अनेकांनी घरातून बाहेर पडून मोकळ्या जागी धाव घेतली.