पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

0

बोदवड शहरातील दुर्दैवी घटना : अपघातानंतर वाहनचालक पसार

बोदवड- पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या सुलोचना रामभाऊ पाटील (60, रा. बोदवड) यांना अज्ञात ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शहरातील जामनेर रस्त्यावर घडली. सुलोचना पाटील या सकाळी फिरायला निघाल्या असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा एक हात व पाय निकामी झाला. बराच वेळ झाला तरी त्या घरी न आल्याने त्यांचा मुलगा व पत्रकार नाना पाटील हे त्यांना शोधायला गेले असता त्या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या तरुण भारतचे पत्रकार नाना पाटील यांच्या मातोश्री होत.