मुंबई – मुंबई महानगर पालिका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असून, बेकायदेशीर बांधकामामुळे घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळून 17 बळी गेले.त्यावेळी‘पहारेकरी’ झोपले होते काय अशी भाजपला विचारणा करीत सर्व संबंधितांवर मनुष्य वधाचे जिन्हें दाखल करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी आज स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला होता यावर बोलताना विखे पाटील यांनी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा कठोर शब्दांत त्यांनी समाचार घेतला. मुंबई महापालिकेत बेकायदेशीर कामांना संरक्षण देणारी आणि त्यातून मलिदा लाटणारी एक यंत्रणा राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या संगनमतातून तयार झाली आहे. त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमावून चुकवावी लागत आहे.
ते म्हणाले,नव्या इमारतीचे बांधकाम मान्यता मिळालेल्या आराखड्यानुसार होते आहे की नाही, जुन्या इमारतींमध्ये बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम सुरू आहे का, हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी महापालिकेचे अधिकारी देखील जबाबदार आहेत. सदरहू इमारतीत बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सुनिल शितप प्रमाणेच अधिकाऱ्यांविरूद्धही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.
घाटकोपर परिसरातील इमारत दुर्घटना प्रकरणी विधानसभेत मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते. बुधवारी सकाळी विखे पाटील यांनी या गंभीर प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधून स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. दुपारी या प्रस्तावावर बोलताना त्यांनी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा कठोर शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेत बेकायदेशीर कामांना संरक्षण देणारी आणि त्यातून मलिदा लाटणारी एक यंत्रणा राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या संगनमतातून तयार झाली आहे. त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव देऊन चुकवावी लागत आहे.
नवीन इमारतीचे बांधकाम मान्यता मिळालेल्या आराखड्यानुसार होते आहे की नाही, जुन्या इमारतींमध्ये बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम सुरू आहे का, हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी महापालिकेचे अधिकारी देखील जबाबदार आहेत. सदरहू इमारतीत बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सुनिल शितप प्रमाणेच अधिकाऱ्यांविरूद्धही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. घाटकोपरच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांवर धाकदपटशा करून सुनिल शितपने बेकायदेशीर बांधकाम सुरू केले होते. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त होता, हे समोर आले पाहिजे. मुंबईच्या गल्लोगल्लीत असे सुनिल शितप निर्माण झालेत त्यांना पोसण्याचे काम महापालिकेत सुरू आहे. घाटकोपर घटनेत जीव गमावणाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर शितपच्या मुजोरीला बळ देणारे खरे हात समोर आले पाहिजेत. मुंबईला ‘सिंगापूर’ किंवा ‘शांघाय’ न करता तिला मुंबईच ठेवा.. मुंबईकरांच्या हितासाठी महापालिकेची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ ‘पब्लिक लिमिटेड कंपनी’ झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – अजित पवार
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार म्हणाले, – घाटकोपर येथील इमारत कोसळली आणि त्यापूर्वीही तशा घटना मुंबईत घडल्या आहेत. हे कधी थांबणार. पालिका प्रशासनाने किती नागरीकांना मारायचे ठरवले आहे.इमारतीचा महत्त्वाचा खांब कोणत्याही प्रकारची अनुमती न घेता तोडला गेला. त्यातून एवढी मोठी दुर्घटना घडली. अशा घटना रोखण्यासाठी पालिका अधिकारी आणि राज्यकर्ते यांची राजकीय इच्छाशक्ती अल्प आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
यावेळी चर्चेत भाग घेताना, भाजप सदस्य योगेश सागर म्हणाले, पुनर्विका,साच्या अटी खूप जाचक. त्यामुळे यापुढे घाटकोपरसारख्या घटनांची दरवर्षी चार याप्रमाणे पुनरालृत्तीा होत राहील.मुंबई उपनगरातील जुन्या इमारतींच्यादुरूस्तीबाबत कोणी बोलत नाही. कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाबाबत कोणी बोलत नाही. टॅक्टकमिटीचा हवाला दिला जोतो पण ही कमिटी म्हणजे दलाल कमिटी झाली आहे. मनपा अधिका-यांकवर अवलंबून न ाराहाता आयआयटी- व्हीजेटीआय इँजिनीयर्स कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. मुंबई व उपनगर प्रश्नांसाठी हाय पॉवर कमिटी नेमा अशी मागणीही सागर यांनी केली.