पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन उपकर्णधार

0

मेलबॉर्न-ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच कसोटी संघामध्ये दोन उपकर्णधाराची निवड केली आहे. अष्टपैलू मिशेल मार्श आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड यांची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवड केली आहे. संघातील सदस्यांनी मदतादानाद्वारे या दोघांची उपकर्णधार म्हणून शिफारस केली होती, त्यानंतर निवड समितीने अंतिम निर्णय घेतल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टीप पेनकडे सोपवण्यात आली आहे.

पाकिस्तानविरोधात दुबई येथे ७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी मिशेल मार्श उपकर्णधार म्हणून एकटाच काम पाहणार आहे. कारण दुखापतीमुळे हेजलवुड या मालिकेतून बाहेर पडला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील वादग्रस्त मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच दौरा आहे. आफ्रिका दौऱ्यामध्ये चेंडू कुरतडल्यामुळे कर्णधार स्टीव स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वार्नर या जोडीवर वर्षभराची क्रिकेटबंदी केली आहे.