पहिल्या फेरीत भारताचा स्टार टेनिसपटू बोपन्ना, पाब्लो पराभूत

0

केलिफोर्निया। बीएनपी परिबास ओपन इंडियन वेल्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताचा स्टार टेनिस खेळाडू राहेन बोपन्ना व त्यांच्या जोडीदार उरूग्वेचा पाब्लो कुएवास यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.या पराभवा नंतरही या स्पर्धेत भारताचे आव्हान कायम आहे.भारताचा दिग्गंज खेळाडू लिएंडर पेस व त्यांचा सहकारी जुआन मार्टिन डेल पोट्रो याचा सामना पहिल्या फेरीत सैम क्वेरी व गिल्स मुलेर याच्याशी होणार आहे.

या स्पर्धेच्या पुरूष वर्गातील पहिल्या दौर्‍यात सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविक व विक्टर ट्रोइस्की या जोडीबरोबर झालेल्या सामना 1 घंटा व 6 मिनिट झाला.या संघर्षपूर्ण सामन्यात बोपन्ना व पाब्लो या जोडीला 2-6,6-3,10-7 पराभूत झाले. बोपन्ना -पाब्लो याची सुरवात चांगली होती. पहिल्या सेट मध्ये बोपन्ना व पाब्लो यांनी 6-2 विजय मिळविला. मात्र पहिला पराभवानंतरही जोकोविक व विक्टर या जोडीने चांगले प्रदर्शन करित दुसरा सेट 6-3 जिकला.यानंतर दोन्ही जोड्यामध्ये जोरदार संघर्षपुर्ण सामना झाला. ज्यामध्ये जोकोविक-विक्टर यांनी आगेकूच करत हा सेट जिकला.