भुसावळ विभागात विविध कार्यक्रम ; विद्यार्थिनींनी चालवली शाळा
भुसावळ- भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यपिका, आधुनिक भारतातील पहिल्या कवयित्री, सामाजिक क्रांतीच्या पहिल्या महिला अग्रदूत क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ विभागातील शाळा-महाविद्यालयासह विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले तर विद्यार्थिनींनी एका दिवसासाठी शिक्षिका म्हणून शाळेचे कामकाज चालवले तसेच मान्यवरांनी सावित्रीमाईंच्या कार्याला उजाळा दिला.
भालोद ग्रंथालयात प्रतिमेचे पूजन
भालोद- कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील ग्रंथालयात प्रतिमेच्या पूजनानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. महापुरूषांच्या जीवनावर दुर्मिळ ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. ग्रंथालय समितीद्वारा आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.कोल्हे होते. डॉ.सुनील नेवे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन आणि कार्यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.दिगंबर खोब्रागडे यांनी तर आभार सविता कोळी यांनी मानले. उपप्राचार्य प्रा.एम.टी.चौधरी, डॉ.वर्षा नेहेते, डॉ.डी. आर.महाजन, डॉ.पी.एम.चौधरी, भानू परतणे, डी.टी.इंगळे, पंकज नेहेते, मुबारक तडवी, तुळशीराम पाटील, बाळू चौधरी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावल महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती
यावल- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग व युवती सभेच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन होते. इतिहास विभाग प्रमुख प्रा.व्ही.बी.पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्याची माहितीदिली. प्रा.डॉ.सुधा खराटे यांनी मार्गदर्शन केले. डिगंबर सुरवाडे, राजेंद्र मोरे व सविता पाटील या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईविषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन म्हणाले की, ज्या सावित्रीबाई फुलेनी शिक्षण प्रसारासाठी प्रचंड योगदान दिले त्या शिक्षणातून गुणात्मक विकास करावा. सूत्रसंचलन प्रा.राजू पावरा तर आभार विशाल पाटील याने मानले. प्रा.ए.पी.पाटील, प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा व बहुसंख्य विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
खिर्डी जि.प.उर्दू शाळेत सावित्रीबाई यांना अभिवादन
खिर्डी- जि.प.उर्दू शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख शाहिद शेख नबी, उपाध्यक्ष साबीर बेग यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शाळेतील विद्यार्थिनींना 360 रुपयाचे धनादेश देण्यात आले. शाळेतील मुख्याध्यापक अहेमद खान समद खान, उपशिक्षक आदिल खान, जावेद खान यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले. उपशिक्षक अनिस खान, एजाज अहेमद, रीझवान खान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिल खान तर आभार अहेमद खान सर यांनी मानले.
बोदवडला सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
बोदवड- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन चिमुकल्या शाळकरी मुला-मुलींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेतन तांगडे यांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संजय काकडे, वी.भ.वि.प. जिल्हाध्यक्ष चेतन तांगडे, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश महाजन, शहीद भगतसिंह वाचनालयाचे संचालक नाना पाटील, निवृत्ती ढोले, संतोष पाडर, जितू बडगुजर, राहुल वाघ, शैलेश वराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बोदवड महाविद्यालयात जयंती उत्साहात
बोदवड- बोदवड महाविद्यालयात प्राचार्य अरविंद चौधरी यांच्याहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डी.एस. पाटील, प्रा. हेमलता कोटेचा,डॉ.प्रभाकर महाले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या प्रकाशनाच्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचे समग्र वाङ्मय’ या पुस्तकाचे वाटप ऑनलाईन करण्यात आले. कार्यक्रमावेळी प्रमुख वक्त्या डॉ. वंदना नंदवे यांनी मार्गदर्शन केले. डॉ.रुपेश मोरे, डॉ.कल्पना राऊत, डॉ.आर.एल.जवरस, डॉ.कामिनी तिवारी, प्रा.अजय पाटील आदींची उपस्थिती होती. प्रस्तावना कांचन नेहते तर सूत्रसंचालन शुभांगी नाईकनवरे, आरती बैरागी व जागृती गवारे यांनी आभार मानले. अश्विनी पाटील, पूजा पाटील आदीं विद्यार्थिनींनी परीश्रम घेतले.