पहुर, भडगाव शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

0

पहूर । येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयातर्फे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. सुधीर तांबे यांचे प्रमुख उपस्थितीत व महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम डॉ. सुधीर तांबे व इतर मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथालयाचे उपाध्यक्ष सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांची देखील उपस्थिती लाभली. त्यांचा सत्कार ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य व पहूर हसवे ग्रा.पं.चे योगेश भदाणे यांचे हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रंथालयातर्फे नवनिर्वाचित जि.प.सदस्य अमित देशमुख यांचा सत्कार अर्जुन आप्पा लहासे यांच्याहस्ते करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे प्रदीपभाऊ कोल्हे, शेंदुर्णी येथील प्रा.सुनिल गरुड यांना देण्याचे ग्रंथालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर जि.प.व पं.स.निवडणुकीत प्रथमचः निवडून आल्याबद्दल आमदार सुधीर तांबे यांनी अमित देशमुख तसेच पहुर कसबेचे उपसरपंच योगेश भदाणे यांचा सत्कार केला.

नवनिर्वाचित जि.प.सदस्य अमित देशमुख
डॉ. तांबे यांचा पहुरपेठ ग्रामपंचायतीतर्फे उपसरपंच प्रदीप लोढा यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. महात्मा फुले यांचे विचार आज देखील मार्गदर्शक असल्याचे मत डॉ. तांबे यांनी त्यांचा मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर गावंडे सर, प्रदीप लोढा यांची मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक व सुत्रसंचालन विवेक जाधव यांनी आभार मानले. यावेळी रामेश्‍वर पाटील, विजय पांढरे, आबा पाटील, जामनेर येथील उल्हास पाटील, भीका पाटील, श्याम साबळे, पहुरपेठचे उपसरपंच इका पहेलवान आदी उपस्थित होते.

भडगावात मान्यवरांकडून अभिवादन
भडगाव । शहरातील शनि चौक, खोल गल्ली, महादेव गल्ली, ओम इलेकट्रीकल्स, यशवंत नगर आदींसह चौकाचौकात सकाळी प्रतिमा पुजन करण्यात आले. प्रतिमापूजन करून मिरवणूक काढण्यात आली. लहान बालक भावेश महाजन यांने महात्मा फुले यांचे वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी अनिल महाजन, साहेबराव महाजन, निंबा महाजन, शिवदास महाजन, विनोद महाजन, पिरन महाजन, देवराम महाजन, मनोज महाजन, प्रदीप महाजन, संतोष महाजन, नगरसेवक-सुभाष पाटील, नगरसेविका योजना पाटील, डि.डि.पाटील, रवी पाटील, जग्गु भोई, रवि अहिरे, नितीन महाजन, सागर महाजन, गोकुळ महाजन, गजु महाजन, बबलू महाजन, गब्बर महाजन आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

लोहारा येथे हनुमान जयंती साजरी
लोहारा । आज येथील जुने बाजारपेठ जवलील हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या 8मार्च पासुन या मंदिरात परमपूज्य राम भारती महाराजांचे प्रवचन सुरु होते काल रात्री हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने मंदिराच्या नवीन कलसाची मिरवणूक सम्पूर्ण गावतुन काढण्यात आली होती तर आज सकाळी हनुमान जन्म सोहळा पर पडला त्याचप्रमाणे कलस स्थपना कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्येवस्थापन समितीसह यंग स्टार क्लबचे सदस्यानी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे गावातील कुलकर्णी वाडया जवलील हनुमान मंदिरात व ग्रामपंचयती जवळच्या हनुमान मंदिरात देखील हनुमान जयंती साजरी करण्यात आली.