पहुर शेंदुर्णी रस्त्यावर नऊ हजारांची दारु जप्त

0

शेंदुर्णी । येथून जवळच असलेल्या पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी गुप्त खबर्‍या कड़ून मिळालेल्या माहिती नुसार सापळा रचुन पहुर शेदुणीॅ रस्त्यावर असलेल्या घोडेश्वार बाबा दरग्या जवळ देशी दारू घेऊन जात असल्यांकडून 9 हजार सहाशे रुपये किंमतीचे दारु जप्त केले. बोरसे यांनी सहकार्‍यांसह साफळा रचला व देशी दारू वाहतुक करणारे प्रकाश राजू माळी, भुषण श्रीकृष्ण माळी यांना ताब्यता घेतले.

दारू वाहतूकदारांकडून टॅगो सकु संत्रा कंपनीच्या 4 खोके त्यात 192 बाटल्या 7 हजार 488 किंमतीचे टॅगो पंच कंपनीचे 3 खोके 154 बाटल्या व दारू वाहतुक करणारी पॅजो रिक्षा हस्तगत केली. पोलीस कॉन्स्टेबल जितुसिंग परदेशी यांच्या फिर्यादी वरून पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल जितुसिंग परदेशी, प्रविण देशमुख करीत आहे.