पहूर । पहूर येथे वाईब्रेशन, सुजोक आणि चिकित्सा शिबीरास आजपासून सुरूवात करण्यात आले आहे. सदरील शिबीर आठवडाभर सुरू राहणार आहे. पहूर पेठ ग्रामपंचायततर्फे विशाल एक्युप्रेशर, सुजोक आणि चिकित्सा शिबीर 17 ते 23 नोव्हेंबर 2017 पर्यंत चालणार असून सदर शिबारात गुढघे, लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह, अॅसीडीटी, डोकेदुखी, डोळे, कान, गळ्याचे रोग, किडनी, मुतखडा, कंबरदुखी, सांधे दुखी, पॅरालिसिस, संधीवात, दमा, उंची वाढविणे, मानसिक तणाव, झोप न येणे अशा विविध रोगांवर औषधाशिवाय ( विनाऔषध) उपचार केले जाणार आहे. या सात दिवसांच्या शिबीरात एक्युप्रेशर उपचारासाठी फक्त एक वेळेस रुपये 100 फी शिबीराच्या ठिकाणी भरावी लागणार आहे. सदर शिबीरात सुरेश चौधरी व जितेंद्र कुमार हे उपचार करणार असून प्रत्येक रोग्यावर दररोज 15 ते 20 मिनट उपचार करण्यात येणर आहे. या शिबीराचा पहूर परिसरातील नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच प्रदिप लोढा, उपसरपंच इका पहेलवान, कृषी पंडित पतसंस्था पहूर व पाळधी शाखा तसेच चेअरमन बाबुराव पांढरे, व्यवस्थापक केलास एकनाथ पाटील यांनी केले आहे.