पहूर येथे चिमुकलीचा सर्प दंश झाल्याने मृत्यू

0

पहूर । येथील लेले नगर भागात राहणार्‍या आठ वर्षीय चिमूकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. संतोषी माता नगर जि.प. प्राथमिक विद्या मंदिरात इ. दुसरीमध्ये शिकणारी पुजा उत्तम पांडव ही रात्री झोपलेली असताना तीला सापाने चावा घेतला. अत्यावस्थ स्थितीत तीला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ नेले मात्र तेथे डॉक्टर नसल्याने तीला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारा दरम्यान पुजाची प्राणज्योत मालवली. दरम्यान पाळधी येथील सर्पमित्राने सापाला पकडले. पूजा एकूलती एक मूलगी होती. तिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आजोबा, काका- काकू असा परिवार आहे. पूजाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.