पहूर । येथील जैन धर्मियांतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही भगवान महावीर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा जैन स्थानक पहूरपेठ येथे विसर्जीत झाली. यानंतर प्रवचन झाले. यानंतर गौतम प्रसादीचे सामुहिक वाचन करण्यात आले.
पहूर पेठ जैन स्थानकतर्फे घेण्यात आलेल्या धार्मिक ज्ञान स्पर्धेसाठी मान्यवरांचेहस्ते लहान बालकांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी गोकूळ चोरडीया यांची पुढील वर्षीचे भगवान महावीर जयंतीचे आयोजन स्वत: करणार असल्याचे जाहीर केले. सदर कार्यक्रमास हिराला छाजेड, सरपंच प्रदीप लोढा, विकास लोढा, पवन रूणवाल, विनोद कोटेचा, अनिल कोटेचा, सचिन लोढा, हिताश लोढा, बबलु कोटेचा, पंकज लोढा, रिषभचंद लोढा, सुगनचंद लोढा यांचेसह असंख्य तरूण, समाजबांधव व महिला उपस्थित होते.