पहूर येथे शेतकर्‍यांची तुती लागवडीत फसवणूक

0

पहूर। पहूर येथील शेतकर्‍यांनी शासकीय योजनेच्या संदर्भात उचललेेले पाऊल असे शासनाच्या अखत्यारीत असलेले कर्मचारी यांनी चक्क धुळीस मिळाविलासारखा प्रकार या शेतकर्‍यांच्या तक्रारीवरुन निदर्शनास आला. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी आर्थिक भुर्दंड सहन करुन आज ना उद्या या योजना आपल्या शेतीपर्यंत येऊन पोहचतील या माध्यमातून रेशीम उद्योग कार्यालय बुलडाणा यांचेकडे धाव घेऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. परंतु रेशीम उद्योग लागवडीच्या जबाबदार अधिकारी चव्हाण यांचेकडे दिलेल्या पैशांची मागणी केली असता. असमाधानकारक उत्तरे देऊन खाली हात परत शेतकर्‍यांना यावे लागले.

चव्हाणांच्या विरोधात तक्रार दाखल
याबाबत संदर्भात शेतकर्‍यांनी न्याय मिळावा या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कृषिमंत्री, पालकमंत्री, जलसंपदामंत्री, जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे एक लेखी निवेदन पाठविले आहे. सदरच्या श्री. चव्हाण यांच्या विरोधात पहूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असून रेशीम उद्योग ही संकल्पना ‘आमची माती आमची माणसं’ या माध्यमातून शासनाचे प्रामाणिक धोरण असून त्या योजनेतील स्वार्थी कर्मचारीच शासनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना चुना लावण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व शेतकर्‍यांनी प्रत्येक तुतीची लागवड केली असता योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने शेतकर्‍यांना तुती उपटून टाकावी लागली त्यामुळे 16 शेतकर्‍यांचा एक गट एकत्र येऊन न्यायाच्या प्रतिमेसाठी एकवटला आहे. सदरच्या रेशीम उद्योगमध्ये चाललेला सावळा गोंधळ थांबवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.